मुंबई : महान्यूज लाईव्ह
दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत आणि तु्म्ही रेल्वेने दुरच्या प्रवासासाठी निघाला असाल, तर ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि जर रेल्वे दोन तासाच्या उशीराने धावत असेल तर तुम्हाला रेल्वेकडून मोफत नाष्टा किंवा जेवण दिले जाते. ही सुविधा शताब्दी, राजधानी किंवा दूरंतोसारख्या एक्स्पेस ट्रेनसाठी उपलब्ध आहे. बऱ्याच प्रवाशांना या नियमाची माहिती नसते.
रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या या मिलबॉक्समध्ये चहा/कॉफी, बिस्कीटे मिळतात. सायंकाळच्या वेळी चहा, कॉफी, ब्रेड, एक बटर चिपलेट देण्यात येते. दुपारच्या जेवणात रेल्वेतर्फे प्रवाशांना चपाती, डाळ आणि भाजी देण्यात येते. हे सगळे अगदी मोफत असते.
परंतू बऱ्याचशा प्रवाशांना याची माहिती नसते. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रवासात असाल, तर तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांना यासंदर्भात जरूर विचारा.