बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती – मोरगाव रस्त्यावर फोंडवाडा येथे काही वेळापूर्वी दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री, झालेल्या अपघातात चारचाकी गाडीने एका पायी चालणाऱ्या व्यक्तीला उडवले असून याच अपघातात दुचाकीलाही धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात पायी चालणारे पिसाळ नावाच्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुचाकीवरील एक महिला व एक मुलगा जखमी झाला आहे. त्यांना बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली सरकारी दवाखान्यात आणण्यात आले आहे. परंतू त्यांचाही मृत्यू झाला आहे.
या अपघातातील चारचाकी गाडी बारामतीहून पुण्याकडे जात होती. अपघातानंतर गाडीतील एअरबॅंग उघडल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातानंतर गाडीचालक ही गाडी सोडून पुण्याकडे निघून गेल्याचे कळते आहे.