शिरूर : महान्यूज लाईव्ह
संपूर्ण देशभर काही काळासाठी आज व्हॉट्सॲप बंद पडले होते.काही काळानंतर पुन्हा व्हॉट्सॲप सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर “मिम्स”चा पाऊस पडत आहे.
मंगळवार दि.२५ रोजी आज सर्वत्र दुपारी साडेबाराच्या दरम्यान व्हॉटसअपची सेवा काही काळासाठी बंद पडली होती. त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत लवकरच सेवा सुरू करण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले. दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान पुन्हा व्हॉट्सॲप कडून सेवा पूर्ववत करण्यात आली.
दरम्यान व्हॉट्सॲपची सेवा बंद करण्यात आल्यानंतर अनेक नेटकऱ्यानी मिम्स केल्याचे पहावयास मिळाले.