मुंबई : महान्यूज लाईव्ह
भारतामध्ये दिवाळी साजरी होत असताना सगळ्या भारताला अभिमान वाटावा अशी एक बातमी आली आहे.भारतीय वंशाचे ऋषी सूनक यांची इंग्लंडचे भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्या पक्षाने निवड केली आहे.
ऋषी सूनक हे भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांचे जावई आहेत. या पदावर निवड होण्यासाठी त्यांना कॉन्झव्हेटिव्ह पक्षाच्या १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे गरजेचे होते
प्रत्यक्षात त्यांना १८५ खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. ते २८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
ऋषी सूनक यांची पंतप्रधानपदासाठी पक्षाने निवड करण्यापूर्वी अनेक घडामोडी घडल्या. एकवेळ त्यांना बाजूला सारून लिज ट्रस यांना पंधप्रधान बनविण्यात आले होते. परंतू त्या केवळ ४५ दिवसच या पदावर राहू शकल्या. त्यानंतर पु्न्हा एकदा पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरु झाली. गेल्या वेळेस माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी पाठिंबा न दिल्याने ऋषी सूनक यांची संधी हुकली होती. मात्र यावेळी बोरीस जॉन्सन यांनादेखील माघार घ्यावी लागली आहे.
अर्थातच ब्रिटनमधील आर्थिक स्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून ऋषी सूनक यांच्यापुढे फार मोठी आव्हाने असणार आहेत.
मात्र भारतीयांसाठी ही मोठी खुषखबर आहे. ज्या इंग्लंडने १५० वर्षे भारतावर राज्य केले, त्या इंग्लंडच्या सर्वोच्च पदावर एक भारतीय वंशाचा व्यक्ती विराजमान होणार आहे.