राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिता काळजी अतिदक्षता म्हणून आपल्या घरातील सोने दागिने पैसे व इतर मौल्यवान वस्तू ह्या सुरक्षित ठिकाणी ठेवावेत जेणेकरून त्या चोरांच्या ताब्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नागरिकांना केले आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या अनेक गावांमध्ये मागील काही दिवसांपासून घरफोडी करुन चोरीचे प्रमाण वाढले आहे. सध्या दिवाळीचा सण असल्याने नागरिकांची दिवाळीच्या खरेदी विक्रीसाठी धावपळ सुरू आहे. ही धावपळ करत असताना नागरिकांनी आपल्या घरातील सोने दागिने पैसे व इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी काळजीपूर्वक ठेवावेत. तसेच अनेक नोकरदार वर्गही दिवाळीच्या सणाला आपापल्या गावी जात असतात. त्यांनीही गावाला जाताना घराला कुलूप लावून व आपल्या शेजारील व्यक्तींना कल्पना देऊन व घरावर लक्ष ठेवण्यासाठी सांगावे, जेणेकरून चोरीच्या प्रकाराला आळा बसेल व आपले घर व आपल्या घराच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतील.
त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराची आपल्या वस्तूंची दक्षता व काळजी घेतल्यास वाढत्या चोरीच्या प्रकाराला आळा बसेल व घरफोडी सारखे प्रकार घडणार नाहीत. असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.