सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरातील गोरगरीब कुटुंबातील नागरिकांना देवदर्शन, गरजूंना शासकीय मदत, आर्थिक दृष्ट्या गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत मिळवून देणे, वैद्यकीय सेवा सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी धडपडणाऱ्या माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले.

इंदापूर शहरातील डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य, उपचार व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन प्रदीप गारटकर व इंदापूर बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या शिबीराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला. तसेच रक्तदान शिबीरामध्ये 54 युवकांनी रक्तदान केले. तसेच निराधार गरजवंत माता पित्यांना साडी चोळी, धोतर, शर्ट टोपी व मिठाईचे बॉक्स देण्यात आले. 22 माता पित्यांनी लाभ घेतला.
यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, डॉ.नामदेव गार्डे, डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. विनोद राजापुरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, गटनेते गजानन गवळी,नगरसेविका राजश्री अशोक मखरे,रिपब्लिक नेते संजय सोनवणे उपस्थित होते.
या प्रसंगी निखिल बाब्रस, दिलीप शिंदे, प्रशांत शिंदे, अल्पसंख्याक अध्यक्ष अहमदरजा सय्यद, बाळासाहेब मखरे, बाळु आडसुळ, नाथा ढावरे, वशिम बागवान, चंदु सोनवणे, राजु गुळीक, सुभाष खरे, स्वप्निल मखरे, प्रविण ननवरे, विलास सोनवणे, अभिषेक कुचेकर, सुमित आरडे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन अजय दादासाहेब सोनवणे यांनी केले