शिरूर : महान्यूज लाईव्ह
दिवाळी निमित्त गावी जाण्यासाठी पुणे अहमदनगर महामार्गावर गावी जाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.अहमदनगर कडे जाणाऱ्या वाहनांनी संपूर्ण महामार्ग आज हाऊसफुल्ल असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दिवाळीचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला होता.यावर्षी मात्र सर्वत्र मोठा उत्साह जाणवत आहे.सलग चार दिवस सुट्ट्या लागल्याने पुणे नगर महामार्गावर बीड,औरंगाबाद,जालना तसेच मराठवाडा कडे जाणाऱ्या वाहनांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे सकाळपासूनच महामार्गावर काही ठिकाणी ट्रॅफिक प्रचंड जाम होत असल्याचे ही दिसून आले आहे.