शिरूर : महान्यूज लाईव्ह
ज्या भागात मागील वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलने झाली,त्या भागात दीड दीड महिने कमरेइतके पाणी शेतात साचले आहे.पाण्याचा निचरा होत नाही,पिके सडून गेली ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना कृषिमंत्र्यांना ओला व सुका दुष्काळ यातील फरक समजतो की नाही असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
कान्हूर मेसाई (ता.शिरूर ) येथे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन परतीच्या झालेल्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, कान्हूर मेसाई ( ता.शिरूर ) हा भाग कायम दुष्काळी. नेहमी पाण्यासाठी टाहो फोडणारा हा भाग. पाण्यासाठी अनेक आंदोलने या पूर्वी या भागात झाली.मात्र परतीच्या पावसाने या भागात मोठे नुकसान केले आहे. बाजरीची पिके सडली आहे. स्वतः शेतात जाऊन पाहणी केलेली आहे. सुमारे ८० टक्के पिकांचे नुकसान झाले असून दीड महिन्यापासून कमरेइतके पाणी शेतात साचून राहिले आहे. कृषीमंत्र्यांना शेतीच्या प्रश्नांची जाण आहे की नाही माहीत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली