सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय वेटलिफटींग/बेंचप्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्या स्पर्धेचे उद्घाटन आज झाल्याची माहिती आयोजक शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिली.
राज्यस्तरीय बेंचप्रेस स्पर्धा इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्ग, वरकुटे पाटी जवळील बळपुडी येथील शिवशंभू पॅलेस येथे आज दिनांक 22 व उद्या दिनांक 23 रोजी पार पडणार आहे.

आज सकाळी दहा वाजता राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून उद्या सायंकाळी चार वाजता राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्र पावरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सरदेसाई यांनी याबाबत शिवशंभू पॅलेसला भेट दिली.या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक भाग आले आहेत. या स्पर्धेत ४०५ पुरुष आणि १७५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील तरूणांना व खेळाडुंना प्रेरणा मिळावी, व तालुक्याच्या युवकांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, हा उद्देश समोर ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक नितीन शिंदे,देविदास पाटील, सुधीर पाटील,मयुर शिंदे यांनी दिली.