पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अंकीत गोयल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
अंकीत गोयल यापुर्वी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गडचिरोलीच्या ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे ते चर्चेत होते. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणूका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.