पुणे : महान्यूज लाईव्ह
आज गुरुवार ( ता. २० ) चे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करून माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवारांनी थेट बारामती गाठली आहे. त्यांच्या या अचानक बारामतीला जाण्याचा राजकीय अर्थ काढला जाऊ लागला असून चर्चांना उधाण आले आहे.
आज ‘क्रिडाविश्वाचा आधारस्तंभ’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन अजित पवारांच्या हस्ते होणार होते. परंतू यासह दिवसभरातील सर्वच कार्यक्रम त्यांनी रद्द केले. सततचे दौरे आणि बदलते हवामान यामुळे अजित पवार यांना व्हायरल इन्फेक्शन झाले असून सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. या कारणामुळे त्यांनी विश्रांती घेणे पसंत केले असून त्यासाठीच ते बारामती मुक्कामी गेले असल्याचे सांगण्यात येते आहे.
कालच ते मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.