मुंबई – महान्यूज लाईव्ह
भाजपने ऋतुजा लटकेंविरोधातील मुरजी पटेलांची उमेदवारी मागे घेतली. मात्र आता दुसऱ्याच दिवशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने भाजपचे, विशेषतः मुरजी पटेलांचे समर्थक नेमके काय करताहेत याचा उलगडा झाला आहे. या समर्थकांनी नोटा ला अधिक मतदान देऊन दिल्लीपर्यंत आपला आवाज पोचविण्याचे ठरवले आहे.
एकंदरीत भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी भाजप समर्थकांनी आपण लटकेंना मतदान करणारच नाही, याउलट आम्ही ताकद दाखवून देणार असल्याचेच एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या ठरवल्याचे दिसून येते.
दोन दिवसांपूर्वी उध्दव ठाकरे यांच्या टिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने उमेदवार मागे घेतला, तरी चांगले बोलायची यांची दानत नाही अशी टिका केली होती. मात्र आता ही क्लिप व्हायरल झाली असल्याने भाजप तोंडावर आपटणार आहे.
आता ऋतुजा लटकेंविरोधात भाजपचे समर्थक नोटाची खेळी करणार आहेत असेच या क्लिपवरून दिसत असून नोटाला पडणारे मतदान हे भाजपचेच असेल असा आरोप शिवसेनेने केला आहे.
आता कदाचित ही क्लिप शिवसेनेनेच व्हायरल केली असाही आरोप भाजप करू शकते. मात्र एकंदरीत लटकेंची उमेदवारी मागे घेणे ही भाजपची अडचण होती हेच सिध्द झाले आहे.
काय आहे ही क्लिप?
या क्लिपमध्ये एक उत्तर भारतीयाचे आवाहन आहे. त्यामध्ये एक व्यक्ती नमस्कार दोतो. मे अतुल जैन असे सांगून त्याच्या आवाहनास सुरवात करतो. यामध्ये तो म्हणतोय की, बहुत दुख हुआ, मुरजी काका के लिए जोर शोरसे तयारी कर रहे थे. इस बार विजय निश्चित था. एक संधी अभीभी अपने पास है. इस चुनाव मे काका नही है.. कमल फूल नही.. लेकीन नोटा है. बहुत पैमाने मे नाराजगी व्यक्त कर सकते है.
जरा भी गलती न करते हुए अभीसे तयारी करो. दिल्ली तक नाराजगी पहुंचा सकते है.. नोटा का बटन दबाकर बहोत कई हजारों मे जाये और इतिहास करे. आनेवाले ३ तारीख को नोटा का बटन दबाकर काका का नाम रोशन करे..