युवराज जाधव, सांगली
ही कहाणी आहे जत तालुक्यातील सिंदूर गावातील या गावातील लक्ष्मी धनेश माडग्याळ या २३ वर्षीय विवाहित महिलेने दोन वर्षाची दिव्या व नऊ महिन्याच्या श्रीशेल याच्यासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दोन आठवड्यापूर्वीच जत तालुक्यातीलच बिलोळी गावातही विवाहितेने तिच्या तीन मुलींसह शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती.
सिंदूर येथील लक्ष्मी माडग्याळ हिचा तीन वर्षापूर्वी झालेला विवाह तिला मान्य नसल्याने तिने गावातीलच धनेश माडग्याळ याच्यासोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यावेळी तिला १८ वर्षे पूर्ण झाली नव्हती. १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोघेही गावात पुन्हा आले आणि शेतात राहू लागले. या दोघांना दोन मुले झाली.
मात्र दरम्यानच्या काळात पोलिस ठाण्यातील प्रकरण मिटविण्यासाठी धनेश याने तिच्या आईवडीलांकडे दिलेल्या पैशावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि त्यातूनच तिने १६ सप्टेंबर रोजी दुपारी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली अशी माहिती सूत्रांनी दिली.