मुंबई : महान्यूज लाईव्ह
यावेळचा पाऊस ठाण मांडून बसल्यासारखा जायचे नावच घेईनासा झाला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य हैराण झाले आहेत. या अडचणीत भर घालणारी एक बातमी पुढे येतेय. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसात म्हणजे २० आणि २१ ऑक्टोबरला एक चक्रीवादळ निर्माण होऊ शकण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळाला त्यांनी ‘ सीतरंग ‘ असे नाव दिलेले आहे.
हे वादळ किती तीव्रतेचे असेल याचा अद्याप अंदाज नाही. पण २३ आणि २४ ऑक्टोबरच्या सुमारास महाराष्ट्राच्या पुर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात आताच परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक जिल्हे या पावसाने प्रभावीत झाले आहेत. शेती, पिके हातातून गेली गेली आहे. पुण्यासारख्या शहरात दुकानातून आणि घरातून पाणी शिरल्याने दिवाळीच्या तोंडावर मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता या चक्रीवादळामुळे ऐन दिवाळीतही पावसाचा तडाखा बसण्याशी शक्यता निर्माण झाली आहे.