कर्जत – महान्यूज लाईव्ह
कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी गावची आणि कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांची ही कहाणी!
बजरंगवाडी गावात अॅट्रॉसिटी अंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास डीवायएसपी अण्णासाहेब जाधव यांच्याकडे होता. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बजरंगवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नदीच्या पात्रात मुसळधार पावसाने पाणी आले. नदी दिसताना छोटी, परंतू त्यातील पाणी वेगाने वाहत होते.
मात्र गावात जायचे, तर नदीपात्रातून पलीकडे जाण्याचाच एकमेव मार्ग होता. तपासासाठी गावात तर जावे लागणार होते. मग जाधव यांना स्थानिकांनी बैलगाडीतून जाता येईल असा पर्याय सांगितला. जाधव यांनी लागलीच तयारी दाखवली.
एका पोलिस कर्मचाऱ्याबरोबर ते बैलगाडीत बसून निघाले. तपासासाठी गावात पोचले. आवश्यक कामे केली आणि परत बैलगाडीनेच ते सरकारी वाहन जिथे होते, तेथे पोचले.