फलटण : महान्यूज लाईव्ह
फलटण येथील सोमंथळी येथे ओढ्याला आलेल्या पुरात पाण्याचा अंदाज न आल्याने रात्री इर्टिका गाडी बुडाली होती. या पाण्यात बापलेकीचा दुर्दैवी व करूण अंत झाला.
याचा व्हिडिओ पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला आहे. त्यामध्ये आज फलटण आणि बारामतीच्या वेशीवर दोघाजणांचा बळी गेला. काल रात्री ओढ्याला अचानक महापूर आला.
पाण्याचा अंदाज लक्षात न आल्याने ईरटीगा गाडी या ओढ्याच्या पाण्यात बुडाली. काल संध्याकाळी दोन ते अडीच तास या परिसरात मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे ओढ्याला महापूर आला होता.
आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. मात्र या दुर्दैवी घटनेत माण तालुक्यातील वारूगड येथील छगन मदने आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी प्रांजल मदने यांचा मृत्यू झाला आहे.