शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या घोडगंगा साखर कारखान्याची स्थगित निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडित असलेली सहकारी संस्था म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखाना ओळखला जातो.काही महिन्यांपूर्वी घोडगंगा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच शासनाकडून निवडणूक स्थागित करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान सत्ताधारी व विरोधक यांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू होत्या.एफआरपी, कामगारांचे थकीत पगार, मयत सभासद वारसनोंद यांसह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी लक्ष वेधले होते.
दरम्यान माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाल्याने तालुक्यात दोन्ही गटांना मोठा धक्का बसला होता. निवडणूक मुद्द्यावर न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्यात आली होती. अखेर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजू समजून घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला प्रत्यादेशाचा आदेश रद्द करत ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित आहे. तिथून पुढे निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे,माजी संचालक ॲड.सुरेश पलांडे,शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार, बाजार समिती संचालक राहुल गवारे यांनी दिली.