दौंड : महान्यूज लाईव्ह
मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी काही जणांची गोम असते.. काही जण वरून सावाचा आव आणतात आणि आतून चोर असतात. दौंडचा उपजिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षक देखील त्यातलीच अवलाद निघाला आहे. दौंड उपजिल्हा रुग्णालयाचा अधीक्षक डॉ. संग्राम डांगे याने दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आरोग्य विभागासह तालुक्यातील सर्व शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक शिंदे याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना घडली होती. या घटनेच्या चर्चेचं गुराळ दौंड तालुक्यात कुठे थांबते ना तोच दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे याच्यासह शिपाई खोत याला पाच हजार रुपयांची लाच घेतानालाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
दुबार विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी डॉक्टर डांगे यांनी शिपाई यांनी हि लाच मागितली होती. याप्रकरणी एका रुग्णाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी (दिनांक १७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपजिल्हा रुग्णाला कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडले.
दरम्यान, याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दौंड उपजिल्हा रुग्णालयाचा अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे हा दौंड जिल्हा रुग्णालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरला आहे. त्याच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता.
त्याच्या ह्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही अनेक राजकीय पक्ष व संघटना कडून करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉक्टर डांगे यांना लाज घेताना पकडल्यानंतर दौंड शहरासह तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.