मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्यातील १८ जिल्ह्यातील १०७९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल आज जाहिर झाला.सत्तापरिवर्तनानंतरची ही पहिलीच राज्यस्तरावरील निवडणूक असल्याने नव्या समीकरणानंतर कोणाची ताकद कीती आहे हे जोखण्यासाठी या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते. आता या निवडणूकांतील निकाल हाती आले आहेत.
यामध्ये सर्वाधिक ठिकाणी भाजपाला विजय मिळाला असून २१३ ग्रामपंचायतींवर कमळ फुलले आहे. मात्र शिवसेनेचा ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर राहिला असून त्यांच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटानेही ९९ ग्रामपंचायती मिळविल्या आहे. दुसरीकडे कॉंग्रेसने १२१ तर राष्ट्रवादीने ७० ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. मात्र कोणत्याही पक्षाच्या नसलेल्या आघाड्यांनी तब्बल २२१ ठिकाणी यश मिळवले आहे.
वाई तालुक्यातील भणंग गावात सर्व राजकीय पक्ष पराभूत झाले असून सर्व जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.
रायगडमध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना जोरदार झटका बसला आहे. त्यांच्या स्वत:च्या खरगली गावात महाविकास आघाडीने त्यांना पराभूत केले आहे.
वर्धा जिल्ह्यातील ७ पैकी ४ ठिकाणी कॉंग्रेस तर ३ ठिकाणी भाजपा.
रत्नागिरी जिल्ह्यात १२ ग्रामपंचायती ठाकरे गटाच्या ताब्यात आल्या आहेत. राजापूरमध्येही १० पैकी ७ ठिकाणी ठाकरे गटाने विजय मिळविला आहे.
रायगडात मविआ २२ तर शिंदे गटाने १८ ग्रामपंचायती मिळविल्या आहेत. येथे भाजपा ५ तर शेकापला ६ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
मात्र प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे आकडे सांगितले जात असून कोणत्याही पक्षाचे अधिकृत चिन्ह न घेतलल्या आघाड्यांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.