दौंड – महान्युज लाईव्ह
दौंड शहरातील सहकार चौकात पाटबंधारे विभागाच्या कॉलनीत एका घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी १० लाख ७२ हजार दोनशे रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रिया महेश रणसिंग ( रा-एरीगेशन काँलनी पिरँमीड हाँस्पीटल शेजारी सहकार चौक) यांच्या नातेवाईकांच्या घरी डोहाळे जेवण असल्याने त्या कुटुंबियांसह घर बंद करून गेल्या होत्या.
या बंद असलेल्या घरात अज्ञात चोरांनी घराचे पाठीमागील बाजुस असलेल्या बाथरुमच्या खिडकीची जाऴी उचकटुन आत प्रवेश करुन १० लाख ७२ हजार दोनशे रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे मौल्यवान किमंतीचे चिजवस्तू चोरून नेल्या.
ही घटना शुक्रवारी (दिनांक १४) रात्री घडली. याबाबत प्रिया रणसिंग यांनी दोन पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही चोरी विकी अजित रणसिंग ( रा. जनता कॉलनी ता. दौंड जि पुणे ) याने केली असल्याचा संशय प्रिया रणसिंग यांनी आपल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.