दिल्ली महान्यूज लाईव्ह
देशातील काही भागात पाळीव परंतू परदेशी संकर असलेल्या कुत्र्यांनी थेट मालकांवर तसेच शेजाऱ्यांवर, रस्त्यावरील पादचाऱ्यांवर केलेल्या हिंस्त्र हल्ल्यानंतर देशात पहिल्यांदा गाजियाबाद महापालिकेने परदेशी कुत्र्यांना पाळण्यास बंदी घातली आहे.
गाजियाबाद महापालिकेच्या हद्दीत यापुढील काळात पिटबुल, रॉटविलर, डोगो अर्जेंटिनो अशा कुत्र्यांना बंदी घालण्यात आली आहे. गाजियाबाद मध्ये १ नोव्हेंबरपासून पाळीव कुत्र्या्ंसाठी नियम घालून देण्यात आले असून त्यासाठी परवाना पध्दत लागू करण्यात आली आहे.
एवढेच नाही, तर गाजियाबाद हद्दीत एका कुटुंबाला एकापेक्षा अधिक कुत्र्यांना पाळता येणार नाही असेही नियम घालून देण्यात आले आहेत. परदेशी जातींपैकी काही कुत्री ही हिंस्त्र असून त्यांना वेळ आल्यास ते मालकावरही हल्ला करतात अशी उदाहऱणे दिसून आल्याने अशी कुत्री पाळता येणार नाहीत असे बंधनकारक करण्यात आले आहे.