विक्रम वरे
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते. विद्यानगरी उभा राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने बारामतीतील चित्र बदलत गेलं. ज्यावेळेस विद्येचे माहेरघर आपण पुण्याची ओळख सांगतो, तस आता ग्रामीण भागामध्ये विद्येचे माहेरघर कुठलेय तर ते तुमची आमची बारामती आहे आणि यामध्ये विद्या प्रतिष्ठान सोबतच बारामतीतील सगळ्याच शिक्षण संस्थांचं योगदान आहे अस अजित पवार म्हणाले. यावेळी टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, युगेंद्र पवार व सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठानला बघता बघता ५० वर्षे झाली.शरद पवार साहेबांनी पहिल कृषी विकास प्रतिष्ठान हा एक ट्रस्ट स्थापन केला.आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठान हा एक ट्रस्ट शिक्षणाच्या करिता स्थापन केला. ५० व्या वर्धापन दिनानिमित्त मोठमोठ्या उद्योगपतींच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी आयोजन करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व्हावं. तुम्हाला शिक्षणाचा सगळ ज्ञान इथ चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हाव यासाठी शरद पवार साहेबांनी त्यावेळेस त्यांच्या सहकाऱ्यांनी लावलेले रोपट बघता बघता ५० वर्षाच झालय. वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आमुलाग्र बदल शिक्षण क्षेत्रामध्ये देखील होत आहेत. आपलं कृषी विकास प्रतिष्ठान,कृषी विज्ञान केंद्र,अग्रिकल्चर कॉलेज याही माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न हा शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार आणि त्यांची टीम करत आहे, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.