राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन २०२२ चा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आज रविवारी तालुक्यातील पाटस येथे आयोजित करण्यात आला आहे. होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज साखरे पाटील, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे, ही माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पासलकर व दौंड तालुकाध्यक्ष कुलदीप गाढवे- देशमुख यांनी दिली.
दौंड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागील अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा त्यांना प्रोत्साहन म्हणून सन्मान व गुण गौरव केला जातो. यंदाही सामाजिक, कला – क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वकील, आरोग्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन २०२२ चा गुणगौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली असून त्यांचा रविवारी ( दिनांक १६ ) पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या पाटस येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दौंड भाजपचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश पासलकर उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्र उभारणीसाठी युवकांचे योगदान या विषयावर प्रा. दिनेश पवार हे व्याख्यानपर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या गुणगौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दौंड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.