भुवनेश्वर – महान्यूज लाईव्ह
राजमहालासारखे आलिशान घर.. अनेक लक्झरी कार आणि तब्बल ३० कोटींची संपत्ती.. अनैतिक मार्गातून विलासी जीवनशैली भोगणारी अर्चना सध्या ओडीसा सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. तिने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४५ नेत्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले..आणि ते उघड करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले..
ओडीसा पोलिसांनी २८ वर्षीय अर्चना नाग या तरुणीला भुवनेश्वरमध्ये अटक केली. तिच्या अटक करण्याने अनेक नेत्यांना दिलासा मिळाला असेल, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. एवढेच नाही, तर एकटी अर्चना राज्य सरकार कोसळण्यासाठी पुरेशी ठरेल असे विरोधी कॉंग्रेसचे आमदार एश.एस. सलुजा यांनी म्हटल्याने तर हे प्रकरण किती खोलवर व राज्यासाठी महत्वाचे आहे हे लक्षात येईल.
पोलिसांनी अर्चना हिला अटक करून तिच्याकडून आक्षेपार्ह व्हिडीओ व पेनड्राईव्ह जप्त केले आहेत. यामध्ये चित्रपट निर्मात्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकांचे अश्लील व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे.
एका ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या अर्चनाला काहीही झाले तरी गरीबीत राहायचे नव्हते. त्यासाठी ती वाट्टेल ते करण्यास तयार होती. त्यातूनच सन २०१८ मध्ये विवाह झाल्यानंतर पतीदेखील तसाच ब्लॅकमेलर भेटल्याने तिने ब्युटी पार्लरमध्ये सेक्स रॅकेट चालवायला सुरवात केली.
तिने फक्त चार वर्षात तब्बल ३० कोटींहून अधिक संपत्ती जमा केल्याचे सांगितले जात आहे. मुली पूरवून त्यातूनच ती बड्या नेत्यांचे खुबीने व्हिडीओ चित्रीकरण करायची. त्यानंतर तेच व्हिडीओचा वापर करून ब्लॅकमेल करून मोठी खंडणी उकळत होती. ते अती झाल्याने पोलिसांना दिलेल्या सूचनावरून पोलिसांनी तिची गठडी वळली आणि खूप मोठे कांड होण्यापासून ओडीसा वाचली..!