विक्रम वरे: महान्यूज लाईव्ह
सोशल मीडियावर काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.असाच एक व्हिडिओ बस चालक आणि प्रवासाच्या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रवाशाला आपला बसथांबा पाठीमागे गेला आहे हे एकदम लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने बस चालकाला बस थांबवण्याची विनंती केली. परंतु बस चालकाने पुढच्या थांब्यावर बस थांबेल, तेथे उतरा असे प्रवाशाला सांगितले.
बसचे दरवाजे लॉक असल्यामुळे प्रवाशाला उतरता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशाने इतर प्रवाशांसमोरच जोरजोरात ओरडायला सुरुवात केली.
परंतु तो प्रवासी काही ऐकायला तयार नव्हता ओ वाचवा, ओ वाचवा, आत्ताच बस थांबवा, पिंपरी चिंचवड मधील हा व्हिडिओ असून हा प्रवासी मोठ्याने ओरडत रस्त्यावरील प्रवाशांना आवाज देत मोठमोठ्याने हा प्रवासी ड्रायव्हर उतरू देत नाय, ड्रायव्हर त्रास देतोय, मदत करा,अरे वाचवा, उतरू देत नाय,आताच बस थांबवा, दरवाजा बंदय, कुठंन उतरू असे प्रवासी मोठमोठ्याने ओरडून सांगत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.