मुंबई – महान्यूज लाईव्ह
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल व शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी ताकद वापरली.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर महापालिकेने स्विकारला व त्यानंतर ऋतुजा लटके यांनी मशाल हातात घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यालयाकडे कूच केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे भाई जगताप, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी होते.
तर मुरजी पटेल यांच्याबरोबर भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, बाळासाहेबांची शिवसेनाचे मंत्री दिपक केसरकर, नितेश राणे आदी पदाधिकारी सहभागी होते.
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गट व शिवसेना उध्दव ठाकरे यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची निवडणूक असणार आहे. दरम्यान मुरजी पटेल हे २५ हजारांच्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकतील असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे, तर ऋतुजा लटके या ५० हजार मतांच्या फऱकाने निवडणूक जिंकतील असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.