मुंबई – महान्यूज लाईव्ह
महावितरण येत्या दिवाळीनंतर ६० ते ७० पैसे प्रतियुनिट दराने वीज बिलात वाढ करण्याची शक्यता आहे. म्हणजेच महिन्याकाठी तुमचे वीजबिल १०० ते २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
वीज उत्पादन खर्च वाढला असल्याने महावितरणची काल वीज नियामक आयोगाबरोबर बैठक झाली. यामध्ये आयोगानेही त्यांना वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे येत्या काळात इंधन समायोजन शुल्क म्हणून सर्वसामान्यांवर १५० ते २०० रुपयांचा भार पडण्याची चिन्हे आहेत.
कोळशाच्या टंचाईचा परिणाम आता जाणवणार आहे. आतापर्यंत फक्त कोळशाच्या टंचाईची फक्त चर्चाच होती. मात्र त्याचा परिणाम आता जाणवणार असून तो थेट सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच आणणार आहे. कदाचित नोव्हेंबरनंतर ही दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.