दिल्ली महान्यूज लाईव्ह
भारतीय जंगलात अनेकदा दुर्मिळ प्रजातीची पक्षी, प्राणी आढळून येतात..मात्र भारतीय वन अधिकारी (आयएफएस) परवीन कासवान यांनी ट्विटरवर ट्विट केलेल्या अनाहूत प्राण्याच्या व्हिडीओने प्राणिमित्रांमध्ये व पर्यावरणप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Do you know what animal are these. And why they are in news recently. pic.twitter.com/Ryt4N7l5Dl
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) October 13, 2022
परवीन कासवान हे सातत्याने नवनवीन गोष्टी ट्विटरवर मांडत असतात. विशेषतः वन व प्राण्यांच्या बाबतीत जे काही नवीन आढळेल, ते मांडत असतात. घनदाट जंगलात सापडलेला हा नवा प्राणी वरकरणी विचित्र दिसत आहे.
मात्र पांडाशी मिळताजुळता असलेल्या प्राण्याच्या दोन गोंडस पिल्लांना वन कर्मचारी हाताळतो आहे. त्याच्या मुठीत बसलेल्या या प्राण्यांच्या प्रेमात सध्या वन्यजीवमित्र आहेत. परवीन कासवान यांनीच भारतासह जगभरातील वन्यप्रेमींना हा प्राणी कोणता ते ओळखा असे कोडे घातले आहे. त्यांच्या ट्विटरवर अनेकांनी वेगवेगळी नावे सांगितली आहेत.
दरम्यान परवीन कासवान यांनीच याची माहिती आणखी एका ट्विटमध्ये दिली असून या प्राण्याचे नाव स्लेन्डर लॉरीस असून तामिळनाडूतील करूर आणि दिंडीगुल जिल्ह्यात विस्तारलेल्या ११ हजार ८०६ हेक्टरमध्ये हा प्राणी दिसून येतो. या गोंडस प्राण्यांना स्लेंडर लॉरिस म्हणतात. ते नैसर्गिकरित्या भारताच्या दक्षिण भागात, अगदी शहरांमध्ये देखील आढळतात. निरुपद्रवी आणि निशाचर, बहुतेक आयुष्य झाडांवर घालवतात. आजवर त्यांच्या डोळ्यांसाठी देखील जोरदारपणे शिकार केली गेली.