कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर जिल्ह्यातील सोनाळी या छोट्याशा गावातून पुढे येऊन कॉम्प्युटर इंजिनिअर झालेल्या अनामिका डकरे हिचं सध्या अख्ख्या कोल्हापूरला कौतुक आहे. तिला अमेरिकेच्या अॅडॉब कंपनीने तब्बल ६० लाख रुपये वार्षिक वेतनाचे पॅकेज दिले आहे.
सध्या याच कंपनीत तांत्रिक अधिकारी पदावर परिविक्षाधीन असलेल्या अनामिकाला कंपनीने ही ऑफर देऊ केल्याने तिच्याविषयी सध्या सगळीकडे अप्रूप आहे.
अनामिकाने कॉम्प्युटर इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर ती अॅडॉब कंपनीत इंटर्नशीप करीत होती. त्या काळात तिला महिन्याला १ लाख रुपयांचा स्टायपेंड मिळत होता. मात्र तिचे कामातील नैपुण्य लक्षात घेत कंपनीने थेट तिला वार्षिक ६० लाखांचे पॅकेज देऊ केले. डी.वाय पाटील अभिया्ंत्रिकी महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनीचे माजी मंत्री बंटी पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी कौतुक केले.