ज्ञानेश्वर रायते, महान्यूज लाईव्ह
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही वर्तमानपत्रांनी गुजरात राज्य उसाचा दर देण्यात कमी पडते. तेथील कारखान्यांनी ३० टक्के एफआरपी अद्याप दिली नाही अशा उथळ बातम्या केल्या होत्या.
त्यावर गुजरातमधील कारखान्यांशी संपर्क साधला असता, तेथील वस्तुस्थितीची माहिती घेतली, खुद्द राष्ट्रीय साखर संघानेही खुलासा केला आणि गुजरातमधील वस्तुस्थिती पुढे आणली. गुजरातमध्ये याहीवर्षी ४ हजार रुपये प्रतिटनापर्यंत उसाला दर मिळालेला आहे
आता जे महाराष्ट्रात शेतकरी संघटना ३ हजार ४ हजार रुपयांचा दर मागत आहेत, तो किती विश्वासार्ह आहे यावर शिक्कामोर्तब करणारा आहे. महाराष्ट्रातही तो दर मिळू शकतो. फक्त शेतकऱ्यांनी संघटित होण्याची गरज आहे.
गुजरातमध्ये गुजरातमध्ये पहिल्यापासूनच फक्त सहकारी साखर कारखाने आहेत. फक्त १९ आहेत, मात्र ते सर्व सहकारी आहेत. त्यांना ना राज्य सरकार मदत करते, ना सरकार त्यांच्या कामात ढवळाढवळ करते. त्यामुळे गुजरातमधील साखऱ कारखाने तीन टप्प्यात उसाला दर देतात आणि तोही भरभक्कम देतात ही वस्तुस्थिती आहे.
अर्थात ज्याला उसाचा धंदा कळतो, अशांनीच या बातम्यांमध्ये पडावे, उगीच काही माहिती न घेता महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांच्या मनात संभ्रम करू नये असे जे बोलले जाते ते अगदी १०० टक्के खरे मानावे लागेल. गुजरातमध्ये उसाला सरासरी १० टक्के साखर उतारा आहे. काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अगदी ९ टक्के तर काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात कमाल ११ टक्के साखर उतारा मिळतो. सरासरी हा साखर उतारा १० टक्क्यांच्या आसपास आहे. मध्यम साखर उतारा क्षेत्रात मोडत असूनही गुजरातच्या साखर कारखानदारीने आदर्श निर्माण केला आहे.
हे खरे आहे की, तीन टप्प्यात हे कारखाने उसाला दर देतात. म्हणून काय झाले? या कारखान्यांनी ही परंपरा बनवली आहे आणि ऊस उत्पादकांनीही ती मान्य केली आहे. मोठे ऊस उत्पादक हेही या कारखान्यांचे वैशिष्ठ्य असून अधिकाधिक ऊस उत्पादन हेही येथील यशाचे गमक आहे. विना सहकार नही उध्दार ही महाराष्ट्राने हाक दिली. मात्र येथे राजकारण वाढले आणि तिकडे त्यातील फक्त विना सहकार एवढाच शब्द गुजरात्यांनी घेतला आणि स्वतःचा विकास साधला.
दरम्यान राष्ट्रीय साखर संघानेही मध्यंतरी
गुजरातमधील कारखान्यांनी २०२०-२१ हंगामात दिलेला दर
बार्डोली कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा १०.७९ टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी ३१२९ रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ३९५३ रुपये एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ८२४ रुपये अधिक दिले आहेत.
गणदेवी कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा ११.०३ टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी ३१९९ रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ४,१११ एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ९१२ रुपये अधिक दिले आहेत.
नर्मदा कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा १० टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी २९०० रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ३५४६ रुपये एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ६४६ रुपये अधिक दिले आहेत.
कोसंबा (पांडवी) कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा ९.८० टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी २८४२ रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ३३४० रुपये एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ४९८ रुपये अधिक दिले आहेत.
मढी कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा १०.१४ टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी २९४१ रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ३५२५ रुपये एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ५८४ रुपये अधिक दिले आहेत.
सयान कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा १०.३६ टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी ३ हजार ४ रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ३७४३ रुपये एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ७३९ रुपये अधिक दिले आहेत.
महुआ कारखाना – या कारखान्याचा सरासरी साखऱ उतारा १०.३० टक्के मिळाला. या कारखान्याची एफआरपी २९८७ रुपये प्रतिटनी होते. या कारखान्याने प्रत्यक्षात ३५३५ रुपये एवढा दर प्रतिटनी दिला. एफआरपीपेक्षा या कारखान्याने ५४८ रुपये अधिक दिले आहेत.