किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
ग्रामीण भागातील महिला पहाटे लवकर उठून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभर आपल्या कुटुंबासाठी कष्ट वेचत असते. दैनंदिन कामातून तिला आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या व्याधींना सामोरे जावे लागते.मात्र वेळीच निदान व योग्य उपचार मिळाल्यास कॅन्सरवर सुद्धा मात करता येते. असे मत स्त्री रोग तज्ञ डॉ विशाल मेहता यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित शारदा महिला संघ, नर्सिंग कॉलेज,मेहता हॉस्पिटल, AK लॅब, सणसर ग्राम पंचायत व छत्रपती कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी सर्व रोग निदान, उपचार, औषध वाटप तसेच डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे व बचत गट विविध उद्योग व्यवसायासाठी अर्थ सहाय्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन सौ.शुभांगी पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या सविता व्होरा, सरपंच पार्थ निंबाळकर, उपसरपंच जोत्स्ना भोईटे, संस्थेच्या समन्वयक गार्गी दत्ता, कारखान्याचे संचालक डॉ. दीपक निंबाळकर, दत्तात्रय सपकळ, गोपीचंद शिंदे, मार्केट कमिटीचे संचालक अमोल भोईटे, हेमंत निंबाळकर, वसंत जगताप, हिंदुराव भोईटे, स्त्रीरोग तज्ञ डॉ विशाल मेहता, डॉ हर्षा जाधव, डॉ साकेत जगदाळे, डॉ.सुजित गवळी, डॉ चंद्रशेखर चव्हाण, डॉ सुनिल ढाके, AK लॅब चे अरविंद मुळीक, अक्षय ओमासे, अक्षय माने, तुषार भरणे, HV देसाई हॉस्पिटलचे डॉ. रुचिका लांडे, डॉ रणजित कदम, डॉ विशाल सपाटे, डॉ मनोहर लावंड, डॉ अभिजित ठोंबरे, छत्रपती कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत ठोंबरे या सर्वांनी आरोग्य शिबीरास सहकार्य केले.
डॉ मेहता यांनी सांगितले की, महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे,आताच्या युगात प्रत्येक स्त्री ही कुटुंबासाठी समाजासाठी झटत असते पण ती स्वतःकडे दुर्लक्ष करते पण योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतले तर कॅन्सर सारख्या आजारावरही मात करू शकतो. म्हणून थोडावेळ आपल्या स्वताच्या जीवनासाठी दिला पाहिजे असे मत डॉ. विशाल मेहता यांनी व्यक्त केले.
सविता व्होरा यांनी सध्याच्या स्थितीमध्ये महिलांकडे प्रचंड शक्ती असून तिला उर्जेता अवस्था व तिला पाठबळ देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ही महिला म्हणजे सावित्री, ही महिला म्हणजे प्रचंड ऊर्जा असल्याचे सांगत या महिलांनी आपल्या मधील ऊर्जा बाहेर काढावी समाजातील बरे वाईट असण्याच्या परिस्थितीमध्ये आपले मत व्यक्त करावे आपला व्यक्तिमत्व विकास घडवावा चूल आणि मूल या परंपरेच्या बाहेर येऊन स्वतःला घडवावे आणि समाज घडवण्यासाठी योगदान द्यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सणसरचे सरपंच पार्थ निंबाळकर यांनी सौ सुनंदा पवार यांनी सणसर परिसरात महिलांसाठी घेतलेल्या या शिबिराबद्दल आभार व्यक्त केले. त्याबरोबरच या पुढील काळातही अशा प्रकारच्या महिलांच्या सक्षमीकरणात उपयोगी ठरणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला सणसर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ पूर्ण परीने पाठबळ देखील असे मत व्यक्त केले.
या शिबिरात महीलांच्या त्वचा, कॅन्सर, दातांच्या समस्या, किडनी, पोटविकार, मुतखडा व डोळे तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. इसीजी, रक्तदाब, मधुमेहाची तपासणी करण्यात आली. 170 महिलांना चष्मे वाटप केले व मोती बिंदुचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. या वेळी इंदापूर तालुक्यातील 8 महिला बचत गटांना शारदा महिला पतसंस्थेच्या वतीने 16 लाख 50 हजार कर्ज विविध व्यवसाय उभारणीसाठी देण्यात आले.
दरम्यान मागील अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील महिलांसाठी संस्थेच्या शारदा महिला संघाच्या माध्यमातून बारामती, इंदापूर, पुरंदर, कर्जत, जामखेड या तालुक्यात महिलांना एकत्र करणे, महिला बचत गट स्थापना, प्रशिक्षणे, व्यवसाय,मार्केटींग ,आर्थिक मदत, आरोग्य तपासणी,व्यवसाय निर्मिती यासाठी कार्य केले जात आहे.
ग्रामीण भागात आजही आरोग्याविषयी खूप उदासीनता आहे, म्हणूनच संस्था महिला आरोग्यासाठी ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर काम करत आहे. आज इंदापूर परिसरातील शारदा महिला संघ सभासद 350 महिलांच्या वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या. कॅन्सर सारखा आजार गंभीर बनत असल्याने वेळोवेळी आरोग्याच्या तपासण्या करून वेळीच महिलांनी सावध राहून काळजी घेतली पाहिजे यासाठी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा विश्वस्त सुनंदा पवार यांनी हे सर्व रोग निदान शिबीर 3 तालुक्यात आयोजित केली आहेत, त्यापैकी इंदापूरचे शिबीर झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा महिला संघाचे प्रमुख बाळासाहेब नगरे, नर्सिंग कॉलेजच्या विना जाधव व सर्व सहकारी, प्रकाश साळुंके, अभिषेक जगताप, तात्या शेलार, गजानन मोकाशी, मंदाकिनी घोडके, निता पवार, नर्सिंग महाविद्यालय यांनी विशेष प्रयत्न केले. महेश सपकळ व पुष्पा निंबाळकर यांनी रुग्णांना अल्पोपहाराची व्यवस्था केली. प्रास्ताविक बाळासाहेब नगरे व आभार अमोल भोईटे यांनी केले.