शिरूर- महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे सोशल मीडिया सेल चे सरचिटणीस अजय हिंगे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
न्हावरे (ता.शिरूर) येथील असणारे अजय हिंगे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम पाहत होते.तसेच राज्याचे सोशल मीडिया सेलमध्ये हिंगे हे सरचिटणीस म्हणून सध्या कार्यरत होते.
अपघाताने अपंगत्व आल्यानंतर त्यावर त्यांनी मात करत राष्ट्रवादी पक्षाचे काम त्यांनी सुरू केले होते. अनेकदा पक्षाचे ते बाजू सोशल मीडियावर प्रभावीपणे मांडत होते. त्यामुळे गाव पातळीवर काम करत असताना थेट राज्याच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्याकडे पक्षाने सोपविली होती. अजय हिंगे यांचा शिरूर तालुक्यात नव्हे तर राज्यातील राष्ट्रवादीतील प्रत्येक नेत्याशी त्यांचा थेट संपर्क होता.
शिरूर चे खासदार डॉ.अमोल कोल्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांसह अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शिरूर तालुक्यातही सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.