पुणे महान्यूज लाईव्ह
शेअर बाजारातील प्रसिध्द दलाल व व्यावसायिकाला २० कोटींची खंडणी मागून त्याचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्यासह १४ जणा्ंवर पुणे पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही कारवाई केली. गज्या उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, संतोष शेलार (तिघेही रा. कोथरूड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील ( रा. पलूस सांगली), अमर शिवाजी किर्दत व फिरोज महंमद शेख ( दोघे रा. कोडोली सातारा), मोनिका पवार (दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), प्रसाद खंडागळे (तळजाई पठार, पद्मावती पुणे), नितीन पगारे (रा. सातारा) या सर्वांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
खनाच्या प्रकरणात मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेने साथीदारांच्या बरोबर तळोजा ते पुणे अशी वाहनफेरी काढून मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीची देशात चर्चा झाली. त्यानंतर तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पोलिसांना आदेश दिले होते. त्यानंतर मारणेला पोलिसांनी येरवडा कारागृहात स्थानबध्द केले. मागील मार्च महिन्यात तो बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्याच्या कारनाम्यांना सुरवात केली
भारती विद्यापीठ परिसरातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला २० कोटींची खंडणी मागण्यात आली. त्यावरून खंडणी विरोधी पथकाने गज्या मारणेच्या टोळीतील ४ जणांना अटक केली. गज्या मारणे मात्र फरार झाला आहे, त्याचा शोध पोलिस घेत आहेत.