राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह.
दौंड तालुक्यातील पाटस येथील सुरज पांडुरंग आडगळे व बारामती तालुक्यातील पूजा बाळासाहेब लव्हे या दोघांचं कॉलेजला असताना प्रेम झाले. आणि दोघांनीही आपापल्या कुटुंबाशी याबाबत चर्चा केली आणि लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र त्यांची लग्न करताना जात आडवी आली. पण पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनी दोन्ही कुटुंबाशी सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि अखेर त्या दोघांचा दौंड तालुक्यातील पडवी येथे सत्यशोधक पद्धतीने आगळावेगळा आंतरजातीय विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
या विवाहामध्ये या नववधू आणि नवऱ्याने महापुरुषांच्या प्रतिमाला पुष्पहार घालून व भारतीय राज्यघटनेचे वाचन करून हा विवाह पार पडला. या आंतरजातीय विवाहाची दौंड तालुक्यात चर्चा झाली. सध्या लग्न जमविताना जातपात, धर्म पाहिला जातो. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत अडागळे व लव्हे या दोन्ही कुटुंबानी जात धर्म न पाहता आपल्या मुलांचा हा विवाह मोठ्या थाटामाटात लावून समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला.
समाजानेही आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्याची आवश्यकता आहे. सुरज पांडुरंग आडागाळे ( रा पाटस ता.दौड जि.पुणे ) व पुजा बाळासाहेब लव्हे ( रा बारामती) या दोघांचे शालेय शिक्षण घेत असताना एकमेकांवर प्रेम झाले. दोघेही पदवीधर आहेत. दोघांनाही लग्न करण्याचा निर्धार केला. दोघांनाही आपल्या कुटुंबाशी याबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला.
सुरज याच्या कुटुंबियांनी लगेच सहमती दर्शवली. नंतर सुरजने मुलीच्या घरच्यांना विचारले असता, सुरवातीला पुजा हिच्या कुटुंबांनी या लग्नाला विरोध दर्शविला पण या दोघांनीही मिळून प्रयत्न केला आणि पुजा हिच्या कुटुंबियांनी या लग्नाला सहमती दर्शवली. सुरजने आपल्या कुटुंबाला सत्यशोधक पध्दतीने विवाह करायचा असल्याचे सांगितले त्यास कुटुंबांनी होकार दिला.
सुरजने याबाबत पुरोगामी चळवळीत काम करणारे संजय म्हस्के, रामचंद्र भागवत, निलेश बनकर यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. अडागळे आणि लव्हे या दोन्ही कुटुंबानी आंतरजातीय विवाह आणि तोही सत्यशोधक पद्धतीने करण्याचा या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. या कार्यकत्यांनी या दोन्ही कुटुंबांना संंत्यशोधक विवाह संदर्भात माहिती दिली. सु
रज व पुजा यांचा रविवारी (दिनांक ९ ) पडवी येथील संत भगवान शंकर फार्म हाऊस याठिकाणी मोठ्या थाटामाटात नातेवाईक मित्र मंडळी यांच्या उपस्थितीत हा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा पार पडला. दौंड येथील डॉ. दत्तात्रय जगताप यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक सार्वजनिक धर्माला अनुसरून सत्यशोधक पद्धतीने हा विधी लावला.