बारामती : महान्यूज लाईव्ह
शेती व शेतीच्या तंत्रज्ञानावर आधारित वेगवेगळ्या स्टार्टअप साठी कॅपजेमिनी इंडिया आणि अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीने “अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्राम” सुरू आहे या अंतर्गत वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या स्टार्टअप ने 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कॅपजेमिनी इंडियाने अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (एडीटी) बारामती, आयकेअर, एआयसी एडीटी बारामती फाउंडेशन यांच्यासमवेत अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्राम सुरु केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्थानिक शेतकर्यांना मदत आणि लाभ मिळवून देण्यासाठी कृषी-संलग्न स्टार्ट-अप्सना इनक्यूबेट करणे हा आहे.
या उपक्रमांतर्गत स्टार्ट-अप्सचे इनक्यूबेशन, फील्ड ट्रायलस, शेतकरी जोडणे, संकल्पनेचा पुरावा/कल्पना प्रमाणीकरण, जागतिक दर्जाच्या मार्गदर्शकांपर्यंत पोहोचणे, संशोधन प्रयोगशाळांच्या सुविधांमध्ये प्रवेश आणि स्टार्टअप इकोसिस्टीम मधील स्टेकहोल्डर लिंकेज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत.
२४ ऑगस्ट २०२२ रोजी अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्रामच्या लाँच कार्यक्रमाचे अनावरण कॅपजेमिनीचे भारतासाठीचे सीएसआर हेड श्री अनुराग प्रताप यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम कॅपजेमिनी इंडिया आणि अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यातील सहकार्याचा एक भाग आहे, ज्याची स्थापना महाराष्ट्र सरकार आणि नीती आयोगाच्या कृषी-संलग्न स्टार्ट-अप्सना स्थानिक शेतकऱ्यांना मदत आणि फायदा मिळवून देण्याच्या प्रयत्नांना पूरक म्हणून करण्यात आली आहे.
भारतीय शेती आणि शेतकरी समुदायांना भेडसावणाऱ्या काही अत्यंत महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या तंत्रज्ञान आधारित स्टार्टअप्सकडून याकरिता आवेदन मागविण्यात येत आहेत.
कॅपजेमिनी अॅग्रीकल्चर ग्रँड चॅलेंज प्रोग्रामसाठी
1. अ) माती आणि/किंवा वनस्पतींच्या ऊतींमधील मॅक्रो/सूक्ष्म पोषक घनता आणि ब) मातीतील सूक्ष्मजीव विविधता तपासणी चाचणीसाठी जलद, अचूक आणि परवडणारी उपकरण/ पद्धत
2. रासायनिक/जैविक/IR पद्धतींद्वारे उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढविण्यासाठी आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी तंत्रज्ञान
3. डाळिंबातील जिवाणूजन्य अनिष्ट (तेलकट) रोगाचा प्रादुर्भाव शोधून त्यावर उपचार करण्यासाठी तंत्रज्ञान. 4. कृषी उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान (नाशवंत फळे आणि भाज्या) 5. निर्यात गुणवत्तेच्या कृषी उत्पादनासाठी जलद, अचूक आणि परवडणारी नाविन्यपूर्ण अवशेष विश्लेषण पद्धत 6. ताजे उत्पादन/दूध आणि दुग्धजन्य पदार्थ/प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ/पिठ/स्वयंपाक आणि खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थांची भेसळ तपासण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान
7. कमी इंधन आणि देखभाल आवश्यक आहे अश्या नाविन्यपूर्ण कृषी अवजारांचा विकास आणि उत्पादन , 8. रासायनिक कीटकनाशके आणि कीटकनाशकांसाठी नवीन जैविक पर्याय, 9. ताज्या शेती उत्पादनासाठी शाश्वत आणि जैवविघटनशील पॅकेजिंग उपाय, 10. बिया/रोपे/ग्राफ्ट मटेरियल आणि उतिसंवर्धित वनस्पतींमध्ये विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोग ओळखण्यासाठी जलद चाचणी पद्धती/किट्स/प्रक्रिया विकसित करणे.
ताज्या शेती उत्पादनांसाठी स्मार्ट आणि ऊर्जा कार्यक्षम साठवण सुविधा, पारंपारिक भारतीय धान्य वापरून तयार केलेले कार्यात्मक आरोग्यदायी अन्न उत्पादने जे तरुणांमध्ये फास्ट फूडच्या सवयी बदलू शकतात. यासाठी नवीन अन्न प्रक्रिया पद्धती, यंत्रसामग्री, प्रक्रिया
वरील प्रोब्लेम स्टेटमेंटस वर समाधानकारक सोल्युशन व तंत्रज्ञान देवू पाहणाऱ्या स्टार्टअप्स एआयसी एडीटी बारामती फाउंडेशनच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा https://bit.ly/Agri-innovation-Accelerator या लिंक वर क्लिक करून अथवा
हा QR कोड स्कॅन करून आपला अर्ज सादर करू शकतात.
या कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर, २०२२ असून कृषी क्षेत्रातील आव्हाने सोडवू पाहात असलेल्या स्टार्टअप्सकरिता पुढील दीड वर्षासाठी इनक्युबेशन आणि बीज भांडवल (सिड फंडिंग) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी मोठ्या प्रमाणात सर्व स्टार्टअप आणि नवउद्योजक्कांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन इंक्युबेशन सेंटर मार्फत करण्यात आले आहे.
बारामती येथील एआयसी एडीटी अटल इंक्युबेशन सेंटर हे कृषी व संलग्न क्षेत्रातील सृजनात्मक व उद्यमशिल स्टार्टअपकरिता काम करीत आहे. स्टार्टअप साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या लॅब जसे फॅबलॅब व मेकरस्पेस लॅब, फूड इनोव्हेशन लॅब, मिडिया लॅब, अॅग्री इनोव्हेशन लॅब तसेच को-वर्किंग स्पेस, ट्रेनिंग रूम, लीगल व आयपी सेल यासरख्या जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
या अॅग्री-इनोव्हेशन प्रोग्रॅमसाठी सिलेक्शन होणाऱ्या आठ स्टार्टअप्सना संशोधनासाठी जागा, लॅब, इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था, मार्गदर्शन व उद्योग स्थापणे साठी बीज भांडवल अशा सुविधा अटल इंक्युबेशन सेंटर कडून पुरवण्यात येणार आहेत. तसेच स्टार्टअप प्रोडक्टस् चे टेस्टिंग, ट्रायलस् आणि सर्टीफिकेशन, बीज भांडवल, शासन अनुदान मिळवून देणे, व्यावसायिक व तांत्रिक तज्ज्ञांशी जोडणे आणि व्यवसायाला पूरक वातावरण व संधी निर्माण करण्यासाठी सेंटरमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
आत्तापर्यंत सुमारे ३२ विद्यार्थी व नवउद्योजक यांनी आपल्या स्टार्टअप साठी प्रोटोटाइप तयार करणे, कंपनी रजिस्ट्रेशन, प्रोडक्ट उत्पादन, मार्केटिंग, बिजनेस प्लॅन, प्राथमिक बीज भांडवल आणि इंवेस्टमेंट या सुविधांचा लाभ घेतला आहे.