महान्यूज करिअर अपडेट
स्टेट बॅंकेत परिविक्षाधिन अधिकारी पदाच्या १६७३ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार हा किमान २१ व कमाल ३० वर्षे वयोगटातील असावा. अनुसूचित जाती, जमातीसाठी ५ वर्षे, ओबीसीसाठी ३ वर्षे, अपंगांसाठी १० वर्षे वयात सवलत आहे.
या भरती प्रक्रियेसाठी खुल्या, ओबीसी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरीता ७५० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती व अपंगांसाठी शुल्कमाफी आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी http://www.sbi.co.in/careers या संकेतस्थळाशी संपर्क साधावा.