नाशिक महान्यूज लाईव्ह
अत्यंत भीषण व भयावह घटना नाशिकमध्ये घडली. खासगी बस व टॅंकरच्या अपघातात बसचे इंजिन फुटले आणि बसने पेट घेतला.. यात अनेकजण साखर झोपेत असल्याने काहीच कळाले नाही. काहींनी उड्या मारल्या..मात्र बसमधून बाहेर न पडता आलेले अक्षरशः होरपळून गेले. या अपघातात १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज असून यात वाढही होऊ शकते..
औरंगाबाद- नाशिक हायवेवरील नांदूरनाका परिसरात आज पहाटे चिंतामणी ट्रॅव्हलची बस व आयशर ट्रकची जोरदार धडक झाली. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून मुंबईकडे निघालेल्या बसमध्ये ४५ प्रवाशी होते.
पहाटे पावणेपाचच्या सुमारास हा अपघात झाला, तेव्हा काहींना कळलेच नाही. काय झाले हे कळायच्या आत बसने पेट घेतला. जे थोडे जागे होते, त्यांनी जीव वाचविण्यासाठी उड्या घेतल्या. मात्र अनेकांना बसमध्ये अडकून पडल्याने आक्रोश करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.
अनेकजण तर जळत्या अवस्थेत बसमधून बाहेर पडताना प्रत्यक्षदर्शींनी पाहीले. तब्बल अर्धा ते एक तास ही बस जळत होती आणि त्या बसबरोबर प्रवाशीही होरपळत होते. या अपघातात तब्बल २८ प्रवाशी जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या ठिकाणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या ठिकाणी भेट देणार आहेत.
प्रभादेवी जाधव (५५), गणेश लांडगे (१९), पुजा गायकवाड (२७), आर्यन गायकवाड (८), इस्माईल शेख (४५), जयसुंबी पठाण (६०), पायल शिंदे (९), चेतन मधुकर, महादेव मारूती, मालु चव्हाण (२२), अनिल चव्हाण (२२), दिपक शेंडे (४०), साहेबराव जाधव (५०), अमित कुमार वय 34, सचिन जाधव वय 30, आश्विनी जाधव – वय 26, अंबादास वाघमारे वय 43, राजू रघुनाथ जाधव – वय 33, निलेश प्रेमसिंग राठोड वय 30, भगवान श्रीपतराव मनोहर (६५), संतोष राठोड (२८), हंसराज बागुल (४६), डॅा. गजकुमार बाबुलाल शहा (७९), त्रिशीला शहा (७५), भगवान लक्ष्मण भिसे (५५), रिस्मिना पठाण (४५), ज्ञानदेव राठोड (३८), अजय देवगण अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.