दिल्ली – महान्यूज लाईव्ह
हिंदूत्वाच्या मुद्द्यावर अतिशय परखड मत असलेली राजकीय व्यक्ती म्हणून अमित शहा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुपरिचित आहेत. त्यामुळे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता अमित शहा यांच्यावर निस्सीम प्रेम करतो. मात्र जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामुल्ला येथील शौकत अली स्टेडिअममध्ये भाषण देताना ते थांबवले..
अमित शहा हे भाषण देत असतानाच अचानक शेजारच्या मशिदीतून आवाज ऐकू येऊ लागला. शहा यांनी व्यासपीठावरील नेत्यांना मशिदीत काय सुरू आहे अशी विचारणा केली, त्यावर पदाधिकाऱ्यांनी अजान सुरू झाल्याचे सांगितले.
मग शहा यांनी भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर मग शहा यांनी उपस्थितांची परवानगी मागितली. भाषण सुरू करू करण्याची परवानगी मागितल्यानंतर प्रार्थना संपल्याचे उपस्थितांनी सांगितले आणि टाळ्याही वाजवल्या.
दरम्यान येथील सभेतही शहा यांनी कणखरपणे काहीजण मला पाकिस्तानशी चर्चेचा सल्ला देत असले तरी मी चर्चा करणार नाही, मला फक्त जम्मू काश्मिरच्या जनतेशी संवाद साधायचाय, मोदी सरकार दहशतवाद थेट नष्ट करते असे त्यांनी सांगितले.