पुणे – महान्यूज लाईव्ह
अलिकडच्या काही महिन्यांपासून काहीसे अडगळीत पडले असले तुकाराम मुंडे जिथे जातील, तिथे शासकीय खात्यांची स्वच्छता करीत आहेत. आता मुंडे यांनी आरोग्य खात्याचे आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक म्हणून पदभार स्विकारताच पुन्हा आपली स्टाईल दाखवण्यास सुरवात केली आहे.
राज्यात प्रत्येक दवाखान्यातून आरोग्य सेवा व्यवस्थित मिळालीच पाहिजे यासाठी मुंडे यांनी पदभार स्विकारताच भेटींचा धडाका सुरू केला आङे. त्यांच्या या भेटीने कामचुकार अधिकाऱ्यांच्या उरात भितीने धडकी भरली आहे.
कारण मुंडे यांनी पुण्यातील आळंदी, वाघोली या ठिकाणी रात्रीच्या वेळी भेटी दिल्या आहेत. आरोग्य खात्याला शिस्त लागावी व सरकारी आरोग्य सेवा नागरिकांना वेळेत मिळालीच पाहिजे यासाठी त्यांनी ही तपासणी सुरू केली आहे. आळंदी व वाघोलीत डॉक्टर उपस्थित होते, मात्र जिथे डॉक्टर हजर नसतील, ते तेथेच निलंबित केले जातील असा इशारा दिला आहे.