बारामतीच्या श्लोक दोशीचा साता समुद्रापार स्केटिंग मध्ये झेंडा! मालदीव मधील आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई!

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह

बारामती : इंदापूर तालुक्यातील भवानीनगरचे कापड व्यापारी अभिनंदन जोशी यांचा मुलगा व बारामतीच्या जनहित प्रतिष्ठानचा दहावीचा विद्यार्थी श्लोक अभिनंदन जोशी यांनी मालदीव मध्ये झालेल्या जागतिक स्केटिंग स्पर्धेत विविध प्रकारात तब्बल चार सुवर्णपदके पटकावून भारताची मान उंचावली.

मालदीव येथे आयोजित करण्यात आलेल्या अंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022  या स्पर्धेत भारताकडून टिम स्पोर्टस एल.यु. पी. इंडिया तर्फे सहभागी झालेल्या श्लोक याने 17 वर्षांखालील वयोगटात  चार सुवर्णपदके पटकावली. 

24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी मालदीवची राजधानी माले येथे रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने मालदीव स्केटिंग फ़ेडरेशन 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतासह अनेक देशातील 123 खेळांडुनी सहभागी घेतला होता.

श्लोकने या स्पर्धेत 100 मीटर. 500 मीटर. 1000 मीटर व 5000 मीटर स्पीड स्केटिंग स्पर्धेत 4 सुवर्णपदके पटाकावली. त्याने 100 मीटर अंतर 9 सेकंदामध्ये पार केले. यावेळी मालदीव ऑलम्पिक कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल सत्तार, ऑलम्पिक कमिटीचे माजी अध्यक्ष इब्राहिम इस्माइल, मालदीवचे उपमंत्री महंमद अजमीत आदी यावेळी उपस्थित होते.

Maha News Live

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

13 hours ago