विक्रम वरे: महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त फॅशन शो, मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात केले. यावेळी महिला आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे आहेत असे मत बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
नवरात्र उत्सवानिमित्त भगिनी मंडळ बारामती व यशश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन शो,मेकअप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, मंगला सराफ आरती शेंडगे, रोहिणी खडसे, प्रियांका शेंडकर उपस्थित होत्या.
यामध्ये टूलीप ब्युटी पार्लर, अकॅडमी ऑफ मॉडर्न आर्ट, ऑरेंज ब्युटी पार्लर, श्रेया ब्युटी पार्लर, एस के ब्युटी पार्लर, शृंगार ब्युटी पार्लर, स्वाती ब्युटी पार्लर यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रिया बागल, मोनिका जावळे यांनी परीक्षक म्हणून काम केले.
प्रथम, द्वितीय, तृतीय अशी तीनही पारितोषिके टूलिप ब्युटी पार्लर ने मिळवली. त्याबद्दल टूलिप ब्युटी पार्लरच्या शुभांगी शिर्के व शुभांगी जामदार यांचे अभिनंदन सुनेत्रा पवार यांनी केले.
यशश्री फाउंडेशनच्या वतीने नऊ मंडळांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय सेविका समिती, भगिनी मंडळ, बारामती तालुका मराठी सेवा संघ व जिजाऊ संघ, श्री दिगंबर जैन श्रविका मंडळ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, लिनेस क्लब, तनिष्का ग्रुप, महादेवी भजनी मंडळ यांचा सन्मान सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी यशश्री फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुप्रिया बर्गे यांनी फाउंडेशन अंतर्गत घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम असाव्यात, त्यांना घराबाहेर पडताना कायदेशीररित्या सुरक्षा मिळावी. यासाठी यशश्री फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी यशश्री फाउंडेशन आयोजित फॅशन शो स्पर्धेतील सर्वच कलाकारांचे कौतुक केले.
तसेच राज्यातील सीईटी परीक्षेत प्रथम आलेल्या कु.वसुधा गंगाधर फडके व नीट परीक्षेत 586 मार्क्स मिळविलेल्या कु.श्वेता संदीप बर्गे यांचाही सत्कार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.