सलमान मुल्ला, उस्मानाबाद
कळंब : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील बार चालकाला लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पकडण्यास गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील चोरट्यांनी जखमी केल्याची खळबळ जनक घटना घडली असून या घटनेत बारचालक देखील जखमी झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अश्रूबा कस्पटे हे ५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या सम्राट बारमध्ये होते. त्यावेळी कन्हेरवाडी येथील नाना भास्कर काळे, हरि भास्कर काळे,कालिदास काळे, राहूल काळे, नाना काळे, अमोल नाना काळे, राजु कालिदास काळे, अश्विन सुभाष काळे यांनी अश्रूबा कस्पटे यांना तलवारीचा धाक दाखवून दारूच्या 8 सीलबंद बाटल्या व रोख 3600 रक्कम लुटून नेली.
अश्रूबा यांनी त्यांना प्रतिकार केला असता त्यांनी कस्पटे यांना लाथाबुक्क्यांनी तर नाना काळे याने उलट्या तलवारीने अश्रुबा यांच्या डोक्यात वार करून त्यांना जखमी केले. याची माहिती मिळताच घटनास्थळी कळंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर व त्यांचे सहकारी दाखल होताच लुटारु चारचाकी वाहनातून पसार झाले.
पोलीस पथकाने अश्रूबा कस्पटे यांना सोबत घेऊन पाठलाग करून आंदोरा शिवारात त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला असता, लुटारूंनी पोलीस अधिकाऱ्यांवरच दगडफेक केली. यामध्ये कल्याण नेहरकर हे जखमी झाले.
दरम्यान याकरणी अश्रुबा कस्पटे यांनी कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून भास्कर काळे, हरी मास्कर काळे, कालिदास भास्कर काळे, राहूत नाना काळे, अमोल नाना काळे, राजू कालिदास काळे, आश्विन सुभाष काळे (रा. कन्हेरवाडी ता. कळंब) यांच्याविरुद्ध कलम ३९५ ३.२३. ५०४ सह शस्त्र कायदा कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.