सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली गावात दसऱ्याच्या दिवशी नाथाच्या मंदिरासमोर बुधवारी (दिनांक ५) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिलांगणाच्या सोने लुटण्याच्या कार्यक्रमावेळी दोन गटातील झालेल्या हाणामारीत इंदापूर पोलिसांनी दोन्ही गटातील पंधरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एका गटाने ॲट्रॉसिटीची व मारहाणीची फिर्याद दिली तर दुसऱ्या गटाने चोरीची व खुनाच्या प्रयत्नाची फिर्याद दिली आहे.
या मारहाणीत लाथाबुक्क्या तसेच सिमेंटच्या खांबाचा, गट्टूचा वापर करण्यात आला. याबाबत एका गटातील
सुधीर रघुनाथ चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दसरा असल्याने शेटफळ हवेलीच्या नाथाचे मंदीरासमोर शिलांगणाचे सोने लुटण्याचे कार्यक्रमाला ज्योत नाचवण्याचा कार्यक्रम चालु असताना सुधीर चव्हाण यांचा भाऊ दिपक याने ती ज्योत हातात घेतली. त्यावेळी सोपान शिंदे याने दिपकला हाताने मारहाण करून जातिवाचक शब्द वापरला. तु ज्योत का हातात घेतली ज्योत घेण्याचा मान फक्त आमचा आहे. तू खालच्या जातीचा आहे असे म्हणुन ज्योत त्याचे हातातुन हिसकावून घेतली आणि मारहाण करीत कार्यक्रमातुन बाहेर काढले.
त्यावेळी फिर्यादी सुधीर चव्हाण हे सोडविण्यास गेले एकाने सुधीर चव्हाण यास तू माझे वडीलांना आडवे का बोलला असे म्हणुन सुधीर चव्हाण व दीपक चव्हाण या दोघांनाही मारहाण केली. त्यावेळी दिपक जागेवरच बेशुद्ध पडला. नंतर त्यातील आठ जणांनी सुधीर यास नाथाचे मंदीरापासुन सोसायटी पर्यंत मारत आणले. सोसायटी जवळ सिंमेटच्या खांबाचा गट्टू पडलेला होता तो चार जणांनी उचलुन फिर्यादीस ठार मारण्याच्या उददेशाने पाठीत कमरेवर पायावर , हातावर जोर जोराने मारला तसेच आरोपींनी हाताने लाथाबुक्यांनी तोंडावर गालावर मारहाण केली.
नंतर जेष्ठ नागरीक सेवा संघाचे ऑफीस जवळ एक आरोपीने फिर्यादी सुधीर चव्हाण यांच्या पायाला धरून फरपटत नेले. त्यावेळी फिर्यादीस जास्त मारहाण झाल्याने घशाला कोरड पडली होती, म्हणुन फिर्यादी पाणी पाजा असे ओरडत होते. तेव्हा एकाने ती बाटली सुधीर यास पाजली. सुधीर यांना ती कडवट लागली व सुधीर यास कोरड्या उलट्या झाल्या. त्यानंतर आणखी माराच्या भीतीने सुधीर हे निपचीत पडुन राहीले.
नंतर चुलत भाऊ निवृत्ती चव्हाण व इतर जमलेल्या लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलावुन इंदापुर सरकारी दवाखान्यात आणुन दाखल केले. तेथे फिर्यादी सुधीर चव्हाण व फिर्यादीचा भाऊ दिपक याचेवर उपचार चालू आहेत. फिर्यादीवरून सोपान शिंदे , स्वप्नील सोपान शिंदे,राजेंद्र बाळकृष्ण शिंदे, प्रल्हाद बाळकृष्ण शिंदे, अविनाश राजेंद्र शिंदे, विलास शिंदे, नितीन ज्ञानदेव शिंदे, विकास मोरे, योगेश तुकाराम शिंदे , सोमनाथ रामचंद्र सावंत (सर्व राहणार शेटफळहवेली ता. इंदापुर जि. पुणे) यांच्यावर कलम 307, 323, 324, 143, 147, 149 अ.जा.ज. अत्या प्रका क3(1) (r)(s) 3(2) (va), नाहस का क7 (1) (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करीत आहेत. प्रभारी पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर हे आहेत.
दुसऱ्या बाजूकडून स्वनील सोपान शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,नाथाचे मंदीरात शिलांगणाचा व सोने लुटण्याचा व ज्योत नाचविण्याचा कार्यक्रम असलेने सदर ठिकाणी फिर्यादी स्वप्नील शिंदे यांचे वडील सोपान शिंदे हे देखिल कार्यक्रमासाठी आले होते.
त्या ठिकाणी दिपक रघुनाथ चव्हाण हा दारूचे नशेत ज्योत नाचवत होता. त्यावेळी ज्योतीच्या ठिनग्या तेथे जमलेल्या लहान मुलांचे व महीलाचे अंगावर पडत असलेने फिर्यादी स्वप्नील शिंदे यांचे वडील सोपान शिंदे यांनी दिपक चव्हाण यास व्यवस्थीत नाचायला सांगीतले त्यावेळी तो सोपान शिंदे यांच्या अंगावर धावून आला व त्यांना शिवीगाळ करू लागला.
कार्यक्रमात गोंधळ झालेने कार्यक्रम बंद झाला. त्यामुळे व लोक आपआपले घरी जावुन लागले त्यावेळी सुधीर रंगनाथ चव्हाण याने फिर्यादी स्वप्नील यांचे वडील सोपान शिंदे यांना शिवीगाळ दमदाटी केली त्या नंतर सोपान शिंदे त्या ठिकाणाहुन निघुन गेले. त्यांनतर फिर्यादी स्वप्नील हे मंदीरापासुन जवळ असलेल्या त्याचे दुध डेअरी जवळ त्याचे चुलत भाऊ नितीन ज्ञानदेव शिंदे, चुलते विलास निवृत्ती शिंदे, राजेंद्र बाळकृष्ण शिंदे असे थांबले असता पाच जणांनी तेथे येवून फिर्यादी स्वप्नील व त्याचे नातेवाइक यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
तुमचेकडे बघतो स्वप्नीलला आज जिवंत सोडायचे नाही असे म्हणुन सुधीर चव्हाण याने त्याचे हातातील लोखंडी गजाने फिर्यादीस ठार मारण्याचे उददेशाने फिर्यादीचे डोक्यात वार केला.त्यावेळी फिर्यादी स्वप्नील यांच्या डोक्यातुन रक्त येवु लागल्याने ते खाली बसत असताना एकाने फिर्यादी स्वप्नील यांची सोन्याची अंगठी हिसकावुन घेतली दुसऱ्याने फिर्यादीचे 10340 रूपये जबरदस्तीने काढुन घेतले.
त्यावेळी दिपक रघुनाथ चव्हाण यांनी त्याचे हातातील काठीने फिर्यादीचे चुलते, चुलत भाऊ यांना मारहाण केली व वरील सर्व आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. फिर्यादीवरुन सुधीर रघुनाथ चव्हाण,दिपक रघुनाथ चव्हाण,सचिन निवृत्ती चव्हाण,नितीन निवृत्ती चव्हाण, अक्षय बापुराव चव्हाण (सर्व रा.शेटफळहवेली ता. इंदापुर जि.पुणे ) यांच्या वर कलम 307, 323,324,327,504,506,143,147, 149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत