पुणे -महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील एका किराणा दुकानादाराकडून २४ लाख घेऊनही अन्नधान्याचा रितसर ठरल्यानुसार पुरवठा केला नाही म्हणून भारती विद्यापीठ पोलिसांनी पुण्यातील चार व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सचिन निवृत्ती नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुशीलकुमार त्रिवेदी, वंदना दायमा, भारत दायमा व राणी दायमा या चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सचिन नरुटे यांचे इंदापूर तालुक्यात किराणा व्यवसाय आहे. आरोपींनी अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे अमिष दाखवून ऑनलाईन पध्दतीने २४ लाख ९ हजार रुपये घेतले होते. मात्र पैसे घेऊनही नरुटे यांना अन्नधान्याचा पुरवठा केला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने नरुटे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी वरील चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.