बारामती महान्यूज लाईव्ह
बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांची जिल्हा पोलिस दलाच्या नियंत्रणक कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या तडकाफडकी बदलीने तालुक्यात वेगवेगळी चर्चा सुरू आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यासंदर्भातील आदेश दिला असून तालुका पोलिस ठाण्याचा तात्पुरता पदभार पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. आज पोलिस अधिक्षकांनी जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार ढवाण यांची नियंत्रण कक्षात बदली केल्याचे स्पष्ट केले आहे.
ढवाण यांच्याविरोधात तक्रारी आल्याने त्यांची बदली केल्याची चर्चा असून ढवाण यांची बदली प्रशासकीय कारणास्तव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ढवाण हे गेल्या काही दिवसांपासून अर्जित रजेवर आहेत. ढवाण यांच्या तडकाफडकी बदलीने बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे.