कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
कोल्हापूरातील तालमीत कुस्तीचा सराव करताना अवघ्या २३ वर्षाच्या पैलवानाला हृयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्याला जीव गमवावा लागला.
पंढरपूरजवळील वाखरी येथील रहिवासी असलेला मारुती हा कोल्हापूरमधील तालमीत कुस्ती शिकत होता. काल संध्याकाळी अंघोळ केल्यानंतर छातीत दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
एका पैलवानाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याची माहिती समजताच कोल्हापूरात खळबळ उडाली. मारुतीचे वडील शेतकरी आहेत. मारुतीच्या निधनाने कोल्हापूरातील कुस्तीचा सराव करणाऱ्या पैलवानांना व त्यांच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.
१५ दिवसांपूर्वीच कोल्हापूरात कुस्तीच्या सरावासाठी आलेल्या व मोतीबाग तालमीत सराव करणाऱ्या शंकर चौगुले या पैलवानाचा २० सप्टेंबर रोजी रंकाळा तलावातील खाणीत बुडून मृत्यू झाला होता. १५ दिवसांतच दुसरी दुःखद घटना घडल्याने पैलवानांना मोठा धक्का बसला आहे.