तर आमचेही कार्यकर्ते शांत बसणार नाहीत,अविनाश खापे पाटील
सलमान मुल्ला, उस्मानाबाद
उस्मानाबाद:-मराठा समाजाबाबत अपशब्द काढलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीने उघड आणि जाहीर धमकी दिली असून सावंत आणि राष्ट्रवादी यांच्यात मोठा संघर्ष सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ‘गद्दार’ म्हणून शिवसेना सतत हिणवत असते शिवाय तानाजी सावंत हे आपल्या बेताल वक्तव्याबाबत कायम चर्चेत असतात. वादग्रस्त विधानांच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या तानाजी सावंत यांनी नुकतेच मराठा समाजाबाबत अत्यंत संतापजनक विधाने केली आहेत.
मराठ्यांना आत्ताच आरक्षणाची खाज आली, मराठा समाजाला आत्ताच आरक्षण आठवले का ? अशी विधाने करून मराठा समाजाला त्यांनी दुषणे दिल्याने मराठा समाज आक्रमक झालेला आहे. सर्वत्र संतापाच्या फैरी सुरु झाल्यावर सावंत यांना माफी देखील मागावी लागली.
तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी उस्मानाबाद येथे अत्यंत कडक शब्दात तानाजी सावंत यांचा समाचार घेत त्यांना थेट धमकी दिली आहे. जर ‘माजलेला एक मंत्री मराठा समाजाबद्धल बेभानपणे बोलतो, तानाजी सावंतानी मराठा समाजाबद्धल व्यवस्थित बोलावे अन्यथा चौकात उघडा करून मारू, याचा माज उतरलाच पाहिजे’ अशा शब्दात सावंत यांना पाटील यांनी धमकावले आहे.
दुसरीकडे आम्ही सत्तेत आहोत. तुम्हाला प्रती आव्हान देणं आम्हाला शोभणार नाही, पण ह्यापुढे बेताल वक्तव्य कराल तर मात्र आमचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असा खणखणीत इशारा युवासेनेचे राज्य का. सदस्य (शिंदे गट) अविनाश खापे-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश पाटलांना दिला आहे..