मुंबई – महान्यूज लाईव्ह
गुजरातच्या मुंब्रा बंदरावर हजारो कोटींचे ड्रग्ज अमली पदार्थ विरोधी पथकाने मागील वर्षी पकडल्यानंतर आता एक नवी बातमी मुंबईतून समोर येतेय. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय़)च्या अधिकाऱ्यांनी वाशीच्या पुलावर ट्रकमधून संत्र्यामध्ये दडवलेले १४७६ कोटींचे कोकेन पकडले.
संत्र्यांनी भरलेल्या ट्रकमधून २०० किलो उच्च दर्जाचे बर्फ व त्यामध्ये ९ किलो कोकेन डीआरआयने जप्त केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई आहे.
या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १४७८ कोटी एवढी आहे. या सापळ्यात ट्रकचालक सापडल्याने ही संत्री कोठून आणली होती, हे कोकेन कोठून ट्रकमध्ये ठेवले होते आणि ते कोठे नेणार होते याची तपासणी सध्या सुरू आहे.
या संत्र्यांच्या ट्रकमध्ये जे २०० किलो बर्फ आढळला, तो उच्च दर्जाचा मेथॅम्फेटामाईन प्रकारचा असल्याने त्याचीही बाजारातील किंमत मोठी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबईच्या डीआरआयला यासंदर्भात कुणकुण लागल्याने त्यांनी वाशीच्याच पुलावर सापळा रचला होता.
वरून संत्र्यांचे बॉक्स व त्यामध्ये हे कोकेन दडवून ठेवले होते. संत्र्यांचे बॉक्स असल्याने कोणीच त्याची चौकशी करणार नाही या हेतूने ही तस्करी करण्यात आली. व्हॅलेन्सिया जातीच्या संत्र्यांची निर्यातक्षम बॉक्स या ट्रकमध्ये ठेवले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.