सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – रात्रगस्तीच्या वेळी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका मारुती ओमनी वाहनाला हात केला.. मात्र ते न थांबता तसेच पुढे निघून गेले. मग पोलीसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. मात्र ओमीनी निमगाव केतकी येथे सोडून वाहनातील तीन जण पळून गेले.
पोलीसांनी वाहन तपासले असता त्यात ४५ हजार ९९० रुपये किंमतीच्या देशी-विदेशी कंपनीची दारूचे आठ बॉक्स होते. त्याच्यासह ओमीनी वाहन असा ३ लाख ३ लाख ५ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला. इंदापूरच्या पोलिसांचे यामुळे कौतुक होत आहे.
३० सप्टेंबर २०२२ रोजी पहाटेच्या सुमारास इंदापूर पोलिसांनी बावडा रस्ता त्याचप्रमाणे निमगाव केतकी रस्ता या दोन्ही ठिकाणी कोंबिंग व नाकाबंदीसाठी पोलीस अधिकारी व अंमलदार नेमलेले होते. त्यानंतर बावडा भागात रात्रगस्तीस असलेल्या सहायक निरीक्षक नागनाथ पाटील यांनी खोरोची ते रेडणी या रस्त्यावरुन जाणाऱ्या ओमनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला.
वाहन चालकाने संशयपदरीत्या रेडणी मार्गाने भरधाव वेगाने गाडी पळवू लागला. त्यानंतर सहायक निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना दिल्यानंतर पोलिसांचे दुसरे पथक त्या गाडीला पकडण्यासाठी निमगाव केतकी ते काटी रोडने नाकाबंदी करत पुढे आली.
पोलिसांच्या पाठलगामुळे ओमिनी गाडी निमगाव केतकी हद्दीतील पानबाजार येथे आडोशाला लावून त्यातील तीन इसम अंधारात पळून गेले. त्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाऊन गाडीची पाहणी केली असता सदर गाडीमध्ये कायदेशीरपणे देशी विदेशी कंपन्या दारूची बॉक्स दिसून आले.
तात्काळ दोन पंचांना त्या ठिकाणी बोलावून त्या अवैध दारूचा सविस्तर पंचनामा करून एकूण ४५९९० रुपये किमतीची देशी-विदेशी कंपनीची दारूचे आठ बॉक्स व रुपये दोन लाख साठ हजार रुपये किमती ची ओमीनी कार (एम एच १२ ए एन ६६३० ) इंदापूर पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतली आहे.
गाडीचा चालक व मालक यांच्याविरुद्ध भादवि कलम २७९,४२७ ३४ व मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(ड) प्रमाणे इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, डी वाय एस पी गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, स.पो.नि. नागनाथ पाटील,सपोनि प्रकाश पवार, सहाय्यक फौजदार कदम, पोलीस हवालदार गायकवाड, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस शिपाई चोरमले, गोसावी, शेख, राखुंडे यांनी मिळून केली.