विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती – जिथे कमी तिथे आम्ही हे ब्रीद वाक्य घेऊन शरयू फाऊंडेशन च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम शरयू फौंडेशन गेल्या अनेक वर्षापासून करत आहे.
शरयू फाऊंडेशन सन २००७ पासून कार्यरत आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणारी पाण्याची अडचण लक्षात घेऊन शरयू फाऊंडेशनने जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. जवळपास बाराशे ते पंधराशे विहिरी, ओढा खोलीकरण, सिमेंट बंधारे यासारखे उपक्रम राबवून शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन काम केले.
त्यामुळे शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शरयू फाऊंडेशनने केलेल्या या कामाचा बारामती इंदापूर फलटण तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. याचबरोबर शरयू फाऊंडेशनने एक लाख वृक्ष लागवड केली. नुसती वृक्ष लागवडच केली नाही, तर त्याचे संवर्धनही केले. सीडबॉल प्रकल्प, कराटे स्पर्धा,आरोग्य क्षेत्रात आणि व्यसनमुक्तीसाठी योगदान दिले.
शिक्षणातील अडचणी दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, गरजूंना स्वेटर, साडीवाटप, स्वच्छता मोहीम राबवून कचराकुंड्याचेही वाटप शरयू फाऊंडेशनने केले. त्याचबरोबर रक्तदान शिबिर सर्व रोग दान शिबिर यांसारखे आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतले.
शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांसाठी, सामाजिक, शैक्षणिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनीही स्व:अनंतराव पवार पुरस्काराच्या वेळी शर्मिला वहिनी पवार व शरयू फाऊंडेशन चे कौतुक केले.
प्रत्येकाच्या सुखदुःखात व सर्व सामान्य लोकांमध्ये सहजपणे वावरणाऱ्या अनेकांचा आधार असणाऱ्या व शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी घडवून आणणाऱ्या शर्मिलावहिनी पवार यांना दीर्घायुष्य लाभो याच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा!